मुळ्याच म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेले कोंब, हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. बहुतेक वेळा मुळव्याधीचा त्रास सौम्य स्वरुपाचा असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत. लक्षणे जाणवत असल्यास बहुतेक वेळा ती खालील स्वरुपाची असतात -
मुळव्याध त्रास होण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. गुदद्वाराजवळील रक्तवाहीन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मुळव्याधीचा त्रास शौचाला कायम नोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्या मुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मुळव्याध होण्याचा धोका खालील कारणामुळे वाढू शकतो:
गर्भावस्थेदरम्यान झालेला मुळव्याध बाळाच्या जन्म दिल्या नंतर बरी होतात.
चुकीच्या खानपान यांमुळेही मुळव्याधीची समस्या होऊ शकते. विशेषत: वारंवार बेकरी प्रॉडक्टस जास्त तिखट व मसालेदार पदार्थ, मांसाहार, व पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, याच प्रमाण कमी असल्यासही हा त्रास होऊ शकतो.
गुदाशयाची आणि गुदद्वाराची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपी नंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारची मुळव्याध आहे हे सांगू शकतात.
पहिली ग्रेड : यातून रक्तस्त्राव होतो मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी बाहेर येत नाहीत.
दुसरी ग्रेड : शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात व पुन्हा आत आपल्या जागी जातात.
तिसरी ग्रेड : शौचाच्या वेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही, ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.
चौथी ग्रेड : या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाही.
मुळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक आहे
मुळव्याधीचे निदान
आपल्या गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी करून डॉक्टर मुळव्याधीचे निदान करतात.
गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी - प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराची बाहेरील बाजूस काही मुळव्याधीचे कोंब आहेत, हे तपासतात, त्या नंतर आतील बाजू तपासली जाते. या तपासणीला DRE( Digital Rectal Examination) म्हणतात.
प्रोक्टोस्कोपी
काही वेळा प्रोक्टोस्कोप वापरून पुढील अंतर्गत तपासणी करणे आवश्यक असते. प्रोक्टोस्कोप ही एक लहान पोकळ नळी असते. प्रोक्टोस्कोप रुग्णाच्या शौचाच्या जागेतून आत घातला जातो त्या मुळे आतील भागाची तपासणी करता येते.
काही वेळा कर्करोग किंवा मोठ्या आतड्याचा इतर काही त्रास नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर आपल्याला कोलोनोस्कोपी (एन्डोस्कोपी) चा सल्ला देऊ शकतात.
मुळव्याधीचा प्रकार, ग्रेड, स्थिती यावर उपचार अवलंबून असतो. सुरुवातीच्या त्रासात जीवन शैलीतील बदल, योग्य आहार आणि औषधोपचार या द्वारे मुळव्याची पासून सहज सुटका करता येते.
आहारातील बदल व स्वत: घ्यावयाची काळजी. आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे. यामुळे शौचाच्यावेळी जोर करावा लागणार नाही यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवावे. फळे, पालेभाज्या कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत.
औषधोपचार
आपल्या गुदद्वाराच्या आत आणि त्या भोवली सूज असेल तर डॉक्टर आपल्याला तिथे लावण्यासाठी स्टेराइड असलेले मलम देऊ शकतात. बद्धकोष्ठ असेल तर शौचास साफ होण्याची औषधे देऊ शकतात.
आहारात बदल करून व औषधोपचार करून देखील मूळव्याधीच्या त्रासात जर काही फरक पडत नसेल तर आपले डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात.
लेझर हेमोरॅडोप्लास्टी ( लेझर ट्रिटमेंट फॉर पाईल्स)
लेझर हेमोरॅडोप्लास्टी हा ग्रेड २ आणि ग्रेड 3 पाईल्सच्या अवस्थेसाठी प्राधान्य दिलेला उपचार आहे. नैसर्गिक गुदद्वाराच्या उघडण्याद्वारे लेझर उर्जेचा वापर विशिष्ठ लेझर उत्सर्जक फायबर द्वारे केला जातो. लेसर उर्जेचे नियंत्रीत उत्सर्जन हिमोराइडल वस्तुमानास आकुंचन करणाऱ्या बाष्पीभवनास कारणीभूत ठरते.
मुळव्याधीवर उपचार करण्याची पारंपारीक पद्धत : शस्त्रक्रियेच्या पारंपारिक पद्धतीमध्ये मूळव्याध कापणीच्या समावेश असतो.
रक्तस्त्राव, वेदना ड्रेसिंग वारंवार क्लिनिकल भेट देणे, पूनरावृत्ती होण्याचा धोका या सर्व गोष्टींचा विचार करून मुळव्याधीसाठी लेझर ट्रिटमेंट करणे सर्वोत्तम मानले जाते.
मुळव्याधीवर लेझर उपचारांचे फायदे :
Copyright © 2023 hospione.com - All Rights Reserved | Developed by Digital Marketing StudioGenix LLP
0 Comments
Leave a Reply
Your email address will not be published.Required fields are marked*